🕒 1 min read
अहमदनगर : केतकी चितळे हिने शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महिलेचं चारित्र्य हनन होतंय किंवा तिला त्रास होतोय म्हणून राज्य महिला आयोग जागं झालं नाही. राज्य महिला आयोगाचे नाव बदलून ‘राष्ट्रवादी महिला आयोग’ केले पाहिजे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा कारवाई करताना भेदभाव करतात, असा आरोप तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
“रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाचं काम करत नाहीत. त्या अपयशी ठरत आहेत. राज्य महिला आयोगाच्या पदावर आल्यापासून २४ तासांत रिपोर्ट द्या, फक्त बैठका घेणं किंवा महिला कक्षाची अचानक जाऊन पाहणी करायची, हे स्टंटबाजी रुपाली चाकणकरांनी बंद करावी. तुम्ही कुठल्या अशा सामान्य कार्यकर्त्या नाही. तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात, तुम्ही आदेश देऊ शकात, हे सगळं बदलू शकता”, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
“एखाद्या कार्यक्रमाची लाइव्ह करून किंवा कुठली गाणी टाकून व्हिडिओ टाकणं म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षाचं काम केलं, असं नाही. रुपाली चाकणकरांनी चांगलं काम करावं. अजूनही तुम्हाला संधी आहे. कृतीतून दाखवा. शरद पवारांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीकडे फक्त एक महिना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं, ही विनंती आहे. कायदा काय असतो? महिला आयोगाला काय अधिकार आहेत आणि कायद्यानुसार कसे धाबेदणाणतात हे मी दाखवून देईन. महिला सक्षमीकरण कसं झालं पाहिजे आणि समान वागणूक कशी दिली जाते, हे मी दाखवून देऊ शकते”, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –


