🕒 1 min read
मुंबई: ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबादचा (KKR vs SRH) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यात नाणेफेक जिंकत विल्यमसनच्या (kane williamson) नेतृत्वात हैदराबाद प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने हैदराबादपुढे १७६ धावांचे बलाढ्य लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना सनरायझर्सने ७ विकेट्सने सामना जिंकला.
नाणेफेक गमवल्यानंतर अय्यरचे (Shreyas iyer) नाईट रायडर्स (KKR) प्रथम फलंदाजीस उतरले. सामन्याच्या सुरुवातीलाच कोलकात्याचे दोन्ही सलामीवीर १० धावाही न करता माघारी परतले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या कर्णधार श्रेयसने केकेआरला सावरायला सुरुवात केली. सुनील नरेन ६ धावा करून बाद झाल्यानंतर नितीश राणाने (nitish rana) श्रेयसला साथ दिली. ज्यात त्याने ५८ धावांचे शानदार अर्धशतक केले. एका बाजूला विकेट पडत असताना राणाने मात्र आपला खेळ सुरूच ठेवला. दीडशेच्या आत केकेआर संपणार तोच आंद्रे रसेलने (andre russell) आपल्या पॉवर हीटिंगने पुन्हा एकदा मैदान मारले. त्याने अवघ्या २५ चेंडूत धमाकेदार ४६ धावा करत कोलकात्याला १७५ धावांपर्यंत पोहचवले.
केकेआरच्या १७६चे पाठलाग करताना कोलकात्याप्रमाणे हैदराबादचेही सलामीवीर लवकर माघारी परतले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या त्रिपाठीने (rahul tripathi) ३७ चेंडूत ७१ धावा केल्या. ज्यात ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. त्याच्या जोडीला ऍडन मार्कमनेही (aiden markam) ३६ चेंडूत ६८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला आहे. हैदराबादसाठी हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
IPL 2022 : सनरायझर्स हैदराबादकडून विजयाची हॅट्ट्रिक! KKRचा ७ विकेट्सने पराभव
IPL 2022 : राणा – रसेलच्या खेळीने कोलकाता सुसाट! सनरायझर्सपुढे १७६ धावांचे लक्ष्य
IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का; दीपक चहर स्पर्धेतून बाहेर!
गुणरत्न सदावर्ते यांना तिहेरी झटका! मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरातही गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
