🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि इतर काही तपास यंत्रणा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यासंदर्भात एनआयएकडून तपास सुरू झाला असून हा ई-मेल नेमका कुणी पाठवला याचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा एनआयए मुंबईला हा ई-मेल जवळपास महिनाभरापूर्वी आला होता. तसेच इतर तपास यंत्रणांनाही हा मेल पाठवण्यात आला. काल (१ एप्रिल) असा ई-मेल आल्याचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर एनआयएने त्याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, ‘माझ्याकडे २० पेक्षा जास्त आरडीएक्स असून मी २० मोठे हल्ले करण्याची योजना आखली आहे. तसेच सर्व आरडीएक्स मोठ्या शहरांमध्ये प्लांट करण्यात आले आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लवकरात-लवकर ठार मारायचे आहे. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करणार आहे’, असे ई-मेलमध्ये म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “नागरिकांनी मास्क घालणं टाळू नये”- विजय वडेट्टीवार
- IPL 2022: आंद्रे रसेलच्या पॉवर हिटिंगचा ‘किंग खान’ही झाला फॅन; ट्वीट करत म्हणाला….
- “हे कमर्शियल आर्टिस्ट येतात अन्..” कुशल बद्रिकेने सांगितला सिद्धार्थ जाधवचा किस्सा
- “आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण मेट्रो सुरु करा”- देवेंद्र फडणवीस
- “…त्यामुळे काहीजण सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारतात”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
