मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022 ) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणापा धडाकेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायरने स्पर्धेच्या मध्यात त्याचा संघ सोडला आहे. काल झालेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने राजस्थानकडून विजयी धावा केल्या आणि आज दुसऱ्या दिवशी सकाळी वेस्ट इंडिजला जाणारे विमान पकडले. पंजाबविरुद्धच्या सामन्यात १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हेटमायरने १९३ च्या स्ट्राइक रेटने १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. हेटमायरने या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार मारले.
राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शिमरॉनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या घरी परतण्याचे कारण समोर आले आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितले, की शिमरॉन हेटमायर आज सकाळी त्याच्या घरी गयानाला रवाना झाला आहे. पहिल्या मुलाच्या जन्मासाठी तो घरी परतला आहे. पण, तो लवकरच संघात सामील होणार आहे. व्हिडिओमध्ये, हेटमायरने सांगितले, की मूल एकदाच जन्माला येते आणि तो पहिल्यांदाच वडील होणार आहे. म्हणूनच तो घरी परतत आहे. त्याचे सर्व सामान येथे आहे. त्याला मिस करू नका, तो लवकरच परत येईल. व्हिडिओमध्ये, सहकारी खेळाडू युझवेंद्र चहल, जेम्स नीशम, रसी व्हॅन डर डुसेन त्याला निरोप देताना दिसले.
Shimron Hetmyer has travelled back to Guyana early morning today for the imminent birth of his first child, but he’ll be back soon. ????
Read more: https://t.co/cTUb3vFiNl#RoyalsFamily | @SHetmyer pic.twitter.com/u52aO9Dcct
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2022
हेटमायर भारतात कधी परतणार याची माहिती राजस्थान रॉयल्सने दिली आहे. फ्रँचायझीने सांगितले, की वडील झाल्यानंतर हेटमायर मुंबईला परतेल आणि संघात सामील होईल. हेटमायरने या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी मॅच फिनिशरची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये २९१ धावा केल्या आहेत. त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. मात्र ७ सामन्यांत तो नाबाद राहिला आहे. यावरून या मोसमात राजस्थानच्या यशात या कॅरेबियन खेळाडूचा किती मोठा हात आहे याची कल्पना येते.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

