🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मधील हंगामात क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंना आपल्या नावाला साजेशी खेळी करता आलेली नाही. या खेळाडूंसाठी संघांनी आयपीएल लिलावात मोठ्या रक्कमा देऊन खरेदी केले होते. मात्र या खेळाडूंनी संघाची निराशा केली आहे. भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना तर संपूर्ण हंगामाचा शेवट आलाय तरी अजूनही लय सापडलेली नाही. दरम्यान या हंगामात भारताच्या युवा खेळाडूंनी मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्याचीही चर्चा सध्या जोर धरत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील तुम्हाला आवडलेला युवा खेळाडू कोणता आहे.
उमरान मलिक
काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने यंदाच्या आयपीएल हंगामात १३ सामन्यात २१ बळी घेतले आहेत. तसेच त्याने या हंगामातील सर्वात वेगवान चेंडूही टाकला आहे. त्याने हैदराबादकडून खेळताना दिल्लीविरूध्द १५७ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे. त्याने खेळलेल्या १३ सामन्यांत सातत्त्याने वेगाने गोलंदाजी केली आहे. त्यामुळे उमरान मलिक सध्या सर्वत्र चर्चेत आहे. उमरानच्या गोलंदाजीचा सरासरी वेग १५२ किमी प्रतितासाच्यावर आहे. आयपीएल २०२२ हंगामात पर्पल कॅपच्या यादीत उमरान सध्या चौथ्या स्थानावर आहे.
Is Umran Malik ready to play T20 for the National Team?
Watch the full video wherein I discuss young Indian players who have performed remarkably in this IPL: https://t.co/wtUIQEtpqi#UmranMalik #ipl #Cricket pic.twitter.com/iurPLN9Vry— Anjum Chopra (@chopraanjum) May 16, 2022
तिलक वर्मा
मुंबईचा संघ यंदा अत्यंत खराब कामगिरीतून जात आहे. त्यांना या हंगामातील खेळलेल्या १३ सामन्यात फक्त ३ सामने जिंकता आले आहेत. संघाची कामगिरी खराब असली तरी तिलक वर्मा मात्र त्याच्या कामगिरीमुळे नेहमी चर्चेत राहिला. मुंबईकडून खेळताना तिलक वर्माने १३ सामन्यांत ३७६ धावा केल्या आहेत. मुंबई संघाला जेव्हा जेव्हा चांगल्या कामगिरीची गरज होती, तेव्हा तिलक वर्माने त्याच्या कौशल्यपूर्ण खेळीने सर्वांची माने जिंकली आहेत.
मोहसिन खान
लखनऊ संघाकडून खेळणारा मोहसिन खान सध्या आयपीएल मध्ये दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. त्याने खेळलेल्या ८ सामन्यांत १३ गडी बाद केले आहेत. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे त्याच्या गोलंदाजीचा इकॉनॉमी रेट ६ धावा प्रती षटक असा आहे. टी २० सामन्यात गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट खूप महत्वाचा आसतो. त्यामुळे सध्या मोहसिन खान त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
