🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील ६५ व सामना सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर खेळला जाणार आहे. मुंबईसाठी ही लढत फक्त सन्मान वाचविण्याची असेल, पण हैदराबादसाठी हा सामना ‘करो या मरो’च्या स्थितीत आहे. हैदराबादने जर हा सामना गमावला तर त्यांचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न संपुष्टात येणार आहे. सामन्यात मुंबईचा संघ हैदराबादचा खेळ खराब करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
आयपीएल २०२२ गुणतालिकेत हैदराबाद संघाचे सध्या १२ सामन्यातून १० गुण आहेत. अशा परस्थितीत संघ उर्वरित दोन्ही सामने जिंकला तर १४ गुण होतील जे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे हैदराबाद संघाला शिल्लक दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकल्यास त्यांचा आशा कायम राहतील. याशिवाय अन्य संघाच्या परिणामावर ते अवलंबून असतील. तर दुसरीकडे मुंबई संघ गुणतालिकेत तळाशी आहे. त्यांना १२ सामन्यात फक्त ३ सामने जिंकता आले असल्याने त्यांचे ६ गुण आहेत.
The ???????????????????????? game to watch out for before the #MIvSRH clash! ????????#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/roAT0ixTzb
— Mumbai Indians (@mipaltan) May 17, 2022
उमरान मलिकच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष
उमरान मालिकने मागील काही सामन्यांत गोलंदाजीत वेगवान मारा करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. त्याच्या या कौशल्यामुळे क्रिकेट चाहते प्रभावित झाले आहेत. या हंगामात त्याने सर्वाधिक १५७ किमी प्रतीतास एवढया वेगाने चेंडू टाकला आहे. उमरानकडे वेगवान मारा करण्याची कला आहे, पण त्याला गोलंदाजी करताना नियंत्रित गोलंदाजी करण्याचे आव्हान असेल. काही सामन्यात उमरानच्या शटकांमध्ये फलंदाजांनी भरपूर धावा लुटल्या आहेत.
हेड-टू-हेड आकडेवारी
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत या दोन्ही संघांमध्ये एकूण सामने १८ खेळले गेले आहेत. यामध्ये मुंबईचा संघ सरस ठरला आहे. मुंबईने १० वेळा बाजी मारली आहे , तर हैदराबादला ८ वेळा विजय मिळवता आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
