Share

IPL 2022 : इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं..! मुंबई इंडियन्सच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; वाचा सविस्तर!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सला सलग नवव्या पराभवाला सोमोरे जावे लागले आहे. मुंबई हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. पण लीगच्या १५व्या हंगामात आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. या मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा हा संघ पहिला संघ ठरला आहे. सोमवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सकडून मुंबईला ५२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील आणखी एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

आयपीएल २०२२ मधील ११ सामन्यांमध्ये मुंबईचा हा नववा पराभव होता. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स आता आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक सामने गमावणारा पहिला संघ बनला आहे. यापूर्वी मुंबईचा संघ आयपीएलच्या एकाही हंगामात इतके सामने (९) हरला नव्हता. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने यापूर्वी २०१८, २०१४ आणि २००९ मध्ये ८-८ सामने आणि २०२१, २०१६ आणि २०१२ मध्ये ७-७ सामने गमावले होते.

असा रंगला सामना..

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सला नवव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या लीगच्या ५६व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (MI vs KKR) चोख प्रत्युत्तर देत मुंबईला ५२ धावांनी मात दिली. या सामन्यात कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल दर्जाची गोलंदाजी करत १० धावांत ५ बळी घेतले आणि कोलकाताला २० षटकात ९ बाद १६५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात मुंबईकडून इशान किशन वगळता इतर सर्व फलंदाज पूर्णपणे ढेपाळले. कोलकाताने मुंबईला ११३ धावांवर ऑलआऊट केले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!