मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. दरम्यान अयोध्या दौऱ्यावरून मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची टिंगल टवाळी केली होती. या पाश्वर्भूमीवर विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
हे राजकीय स्वार्थासाठी सुरु आहे. राज ठाकरे यांना अयोध्याला जाण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राज ठाकरे यांना रामलल्ला प्रसन्न होणार नाही असे देखील विनायक राऊत म्हणाले आहेत. तर शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्याशी लढण्यासाठी फडणवीस कमी पडले म्हणून ते राज आणि नवनीत राणा यांचा वापर करत असल्याची टीका विनायक राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.
तसेच नवनीत राणा आणि राज ठाकरे यांचा बोलवता धनी भाजप आहे अशी टीका करत राणा, राज ठाकरे आणि भाजपवर विनायक राऊत यांनी टीका केली आहे. राणा यांचे फोटो यापूर्वी समोर आले आहेत. खोटे बोला पण रेटून बोला हे राणा करत असून दिल्ली भाजपसोबत जवळीक वाढवत महाराष्ट्रतील सरकारला त्रास देण्याचं काम नवनीत राणा करत आहेत. शिवाय राणा यांनी कोर्टच्या नियमांचा उल्लंघन केले आहे. त्याचा विचार कोर्ट करेल असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –


