Share

शेतकऱ्याने शेती संरक्षणासाठी चक्क अस्वल ठेवलं नोकरीवर; महिना १५ हजार रुपये

Published On: 

🕒 1 min read

तेलंगणा : मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीचे पक्षी-प्राण्यांमुळे मोठं नुकसान होत असते. त्यामुळे शेतकरी काही ना काही युक्ती लढवत असतात. बरेच शेतकरी शेतात बुजगावणी उभी करतात. मात्र तेलंगणातल्या शेतकऱ्याने वेगळीच युक्ती लढवली आहे. त्यानं शेतीच्या संरक्षणासाठी चक्क एक अस्वल नोकरीवर ठेवले आहे. त्याला दिवसाला ५०० रुपये पगार आहे.

शेतकरी भास्कर रेड्डी यांनी आपल्या शेतात एका व्यक्तीला नोकरी दिली आहे. ही व्यक्ती त्यांच्या शेतात अस्वल बनून पहारा देते. माकडांनी शेताचं नुकसान करू नये याची काळजी घेण्याचं काम ही व्यक्ती करते. रेड्डी तेलंगणातल्या सिद्दिपेटचे रहिवासी आहेत.

माकडांपासून तसेच जंगली डुकरांपासून शेताचं रक्षण करण्यासाठी भास्कर रेड्डींनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांच्या शेतात अस्वलाचा पोशाख घालून एक व्यक्ती फिरत असते. त्याला रेड्डींनी नोकरीवरच ठेवलं आहे. शेतीची राखण करण्यासाठी रेड्डी त्याला दिवसाला ५०० रुपये देतात. अस्वलाच्या वेशात वावरणाऱ्या या माणसाची आणि त्याला कामाला ठेवणाऱ्या रेड्डींची सध्या चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

“उत्तरप्रदेशात मशिदींवर भोंगे नाहीत का?”- मनिषा कायंदे
RRR मधून आलिया भट्टचेच नव्हे तर मकरंद देशपांडेंचेही सीन्स केले कट
“महाविकास आघाडीचे सरकार हे हिंदू विरोधी…”- नितेश राणे
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून हृतिकची एक्स मेहुणी फराह खान अली म्हणाली..
“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”; भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!