Share

IPL 2022 LSG vs KKR : लखनऊ ऑन टॉप..! कोलकाताचा तब्बल ७५ धावांनी उडवला धुव्वा

Published On: 

पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ५३व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाइट रायडर्सवर (LSG vs KKR) ७५ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात टॉस गमावलेल्या लखनऊने कोलकाताला १७७ धावांचे आव्हान दिले होते. क्विंटन डी कॉकने लखनऊकडून अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात आंद्रे रसेल (४५) वगळता सर्व फलंदाज पूर्णपणे ढेपाळले आणि कोलकाताचा डाव १०१ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह लखनऊ संघाने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

कोलकाताचा डाव

लखनऊच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची खराब सुरुवात झाली. वेगवान गोलंदाज मोहसिन खानने सलामीवीर बाबा इंद्रजितला शून्यावर माघारी धाडले. जेसन होल्डरने दुसरा सलामीवीर आरोन फिंचला (१४) जेसन होल्डरने बाद करत कोलकाताला दुसरा धक्का दिला. कप्तान श्रेयस अय्यर (६), नितीश राणा (२) आणि रिंकू सिंहही (६) मोठी खेळी करू शकले नाही. प्रमुख गोलंदाज आवेश खानने राणाचा त्रिफळा उडवला. तर स्फोटक आंद्रे रसेललाही बाद करत लखनऊचा विजय निश्चित केला. रसेलने १९ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकार ठोकत ४५ धावा केल्या. रसेल बाद झाल्यानंतर कोलकाताचा डाव घसरला. १४.३ षटकात लखनऊने कोलकाताला १०१ धावांवर ऑलआऊट केले. लखनऊकडून आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

लखनऊचा डाव

लखनऊचा कप्तान केएल राहुल शून्यावर धावबाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉकने आक्रम फटकेबाजी केली. क्विंटनने दीपक हुडासोबत ७१ धावांची भागीदारी केली. डी कॉकने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. सुनील नरिनने त्याला बाद केले. संघाच्या शतकानंतर रसेलने हु़डाला झेलबाद केले. हुडाने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावांची खेळी केली. १८व्या षटकात मार्कस स्टॉइनिसने फटकेबाजी केली. या षटकात स्टॉइनिसने शिवम मावीला सलग तीन षटकार खेचले, पण चौथ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. पुढच्या दोन चेंडूंवर जेसन होल्डरने मावीला अजून दोन षटकार ठोकत मावीचे गणित बिघडवले. या षटकात लखनऊला ३० धावा मिळाल्या. शेवटच्या षटकात होल्डर बाद झाला आणि लखनऊला या षटकात फक्त ४ धावा मिळाल्या. लखनऊने २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या. रसेलने कोलकाताकडून २ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, आयुष बदोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान, मोहसिन खान.

कोलकाता नाइट रायडर्स – आरोन फिंच, बाबा इंद्रजित (/यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, सुनील नरिन, टिम साऊदी, शिवम मावी, हर्षित राणा.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!