Share

IPL 2022 : “आई फक्त तुझ्यासाठी…” स्पेशल जर्सी घालून मैदानात उतरले लखनऊचे खेळाडू; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२च्या ( IPL 2022) ५३व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना शनिवारी (७ एप्रिल) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात सुपर जायंट्सचे खेळाडू स्वतःच्या आईच्या नावाची जर्सी घालून मैदानावर उतरणार आहेत. या नव्या आयपीएल (IPL) संघाने चालू हंगामातील कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. मातृदिन दरवर्षी ८ मे रोजी साजरा केला जातो. पण सुपर जायंट्सने मदर्स डेच्या एक दिवस आधी तो साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सने शनिवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये खेळाडूंच्या जर्सीच्या मागे त्यांच्या आईचे नाव लिहिले होते. फ्रेंचाइजीने या व्हिडिओचे कॅप्शन लिहिले, ‘हे तुझ्यासाठी आहे आई.’

लखनऊ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत सामना जिंकून प्लेऑफ मध्ये जाण्याचे आपले स्थान मजबूत करु शकतात. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्ससाठी प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राह्ण्यासाठी हि लढत ‘करो या मरो’ अशी आहे. कारण आता एका पराभवाने केकेआरचे प्लेऑफमध्ये जाण्याचे समीकरण बिघडू शकते.

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलच्या १५व्या मोसमात आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ७ जिंकले असून ३ सामने गमावले आहेत. १४ गुणांसह लखनऊचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफसाठी पात्र होण्यापासून तो फक्त दोन पावले दूर आहे. लखनऊच्या संघाने आजच्या सामन्यात विजय मिळवला, तर अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग सुकर होईल. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरच्या संघाने या मोसमात १० सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी ४ जिंकले असून ६ सामने गमावले आहेत. केकेआर आठ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!