Share

IPL 2022 PBKS vs RR : राजस्थान इज बॅक..! वानखेडेवर पंजाब किंग्जला हरवलं; मुंबईकर खेळाडू चमकला!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये ५२व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कमबॅक करत पंजाब किंग्जवर (PBKS vs RR) ६ गड्यांनी विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पंजाबने राजस्थानला १९० धावांचे आव्हान दिले. पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोने अर्धशतक ठोकले तर जितेश शर्माने फिनिशरची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात संघात कमबॅक केलेल्या मुंबईकर यशस्वी जयस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने २ चेंडू शिल्लक ठेवून विजयावर शिक्कामोर्तब केले.

राजस्थानचा डाव

जोस बटलरसह पुन्हा संधी मिळालेल्या यशस्वी जयस्वालने उत्तम सुरुवात करून दिली. बटलरनेही आक्रमक अंदाजात ५ चौकार आणि एका षटकारासह ३० धावा केल्या. वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने त्याला झेलबाद करत पंजाबला पहिले यश मिळवून दिले. कप्तान संजू सॅमसनही (२३) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. देवदत्त पडिक्कलने संथ ३१ धावा करत संघाला एका बाजूने सावरले. २०व्या षटकात शिमरॉन हेटमायरने २ चेंडू शिल्लक ठेवत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेटमायरने नाबाद धावा केल्या.

पंजाबचा डाव

पंजाबने खराब फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टोला आज पुन्हा संधी देत शिखर धवनसोबत सलामीला पाठवले. त्यानेही संधीचे सोने करत फटकेबाजी केली. धवनला (१२) लवकर तंबूत पाठवण्यात रवीचंद्रन अश्विन यशस्वी ठरला. जोस बटलरने धवनचा एकहाती जबरदस्त झेल घेतला. भानुका राजपक्षेने बेअरस्टोसोबत धावा केल्या. त्याने २ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावा केल्या. अर्धशतक ठोकलेल्या बेअरस्टो आणि कप्तान मयंक अग्रवालला (१५) फिरकीपटू युझवेंद्र चहलने १५व्या षटकात बाद केले. जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी शेवटच्या षटकात फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी रचली. १९व्या षटकात प्रसिध कृष्णाने लिव्हिंगस्टोनला (२२) क्लीन बोल्ड केले. २०व्या षटकात जितेशच्या फटकेबाजीमुळे पंजाबने १६ धावा ठोकल्या. जितेशने १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. २० षटकात पंजाबने ५ बाद १८९ धावा केल्या. चहलने ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल (कप्तान), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा.

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!