पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ५३व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (LSG vs KKR) आमनेसामने आले आहेत. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊने कोलकाताला १७७ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकने लखनऊकडून अर्धशतकी खेळी केली. लखनऊचा संघ १० पैकी ७ सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर कोलकाताचा संघ १० पैकी ४ सामने जिंकून आठव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतीमुळे हा सामना खेळत नाहीये.
लखनऊचा डाव
लखनऊचा कप्तान केएल राहुल शून्यावर धावबाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉकने आक्रम फटकेबाजी केली. क्विंटनने दीपक हुडासोबत ७१ धावांची भागीदारी केली. डी कॉकने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. सुनील नरिनने त्याला बाद केले. संघाच्या शतकानंतर रसेलने हु़डाला झेलबाद केले. हुडाने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावांची खेळी केली. १८व्या षटकात मार्कस स्टॉइनिसने फटकेबाजी केली. या षटकात स्टॉइनिसने शिवम मावीला सलग तीन षटकार खेचले, पण चौथ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. पुढच्या दोन चेंडूंवर जेसन होल्डरने मावीला अजून दोन षटकार ठोकत मावीचे गणित बिघडवले. या षटकात लखनऊला ३० धावा मिळाल्या. शेवटच्या षटकात होल्डर बाद झाला आणि लखनऊला या षटकात फक्त ४ धावा मिळाल्या. लखनऊने २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या. रसेलने कोलकाताकडून २ बळी घेतले.
A direct hit from Shreyas Iyer and KL Rahul is Run Out.
Live – https://t.co/xxTbopT08k #LSGvKKR #TATAIPL pic.twitter.com/cEmMt2rJaZ
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, आयुष बदोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान, मोहसिन खान.
कोलकाता नाइट रायडर्स – आरोन फिंच, बाबा इंद्रजित (/यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, सुनील नरिन, टिम साऊदी, शिवम मावी, हर्षित राणा.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

