🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा (LSG vs KKR) २ धावांनी पराभव करून प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघ हा यंदाच्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा गुजरात टायटन्सनंतरचा दुसरा संघ बनला आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्स संघाला २० षटकांत ८ गडी गमावून २०८ धावा करता आल्या.
या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने चमकदार कामगिरी करत ४ षटकात २० धावा देत तीन बळी घेतले. राहुल मोहसीनच्या कामगिरीने प्रभावित झाला आणि त्याने कौतुक करत मोठे वक्तव्य केले. राहुल म्हणाला, “मोहसीन खान जेव्हापासून खेळत आहे तेव्हापासून तो चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्याकडे एक उत्तम शैली आहे आणि ती खूप चांगली वापरत आहे. कधी स्लो बॉलिंग करायची आणि कधी फास्ट बॉलिंग करायची हे त्याला माहीत आहे. तो लवकरच भारतीय संघाची जर्सी परिधान करेल यात शंका नाही. भारतीय संघाची नजर नेहमीच डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांवर असते.”
Aisa josh jisne uda diye hosh! Super proud of our #SuperGiants on this zabardast jeet ???????????? #abapnibaarihai????#AbApniBaariHai???? #IPL2022 ???? #bhaukaalmachadenge #LSG #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #lsg2022 pic.twitter.com/hfOfpuxCjZ
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 18, 2022
त्याचवेळी राहुलने सामन्यात शतक झळकावणाऱ्या क्विंटन डी कॉकचे (नाबाद १४० धावा) कौतुकही केले. सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला, ”आज शेवटच्या षटकांमध्ये मी प्रेक्षक होतो. डी कॉकने संपूर्ण मोसमात शानदार फलंदाजी केली आहे. डी कॉकने शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले हे पाहून खूप आनंद झाला.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

