नवी दिल्ली :- कॉमेडियन भारती सिंग हिने दाढी आणि मिशावरून केलेल्या विनोदामुळे शीख समुदाय संतप्त झाला. पोलिसांनी भारती सिंगविरुद्ध आयपीसी कलम २९५-ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा एसजीपीने नोंदवला आहे. याआधी देखील भारती सिंग हिने दाढी मिशांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तिला मोठया प्रमाणात विरोध झाला होता.
भारतीने आपल्या एका शो मध्ये दाढी-मिशांवर विनोद केला होता. त्या विनोदावर शीख समाजातील लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एसजीपी भारती सिंग च्या विरोधात एफआयआर नोंदवणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. एसजीपीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की , भारती सिंग च्या या विनोदावर शीख समाजाचे लोक खूप नाराज आहेत. भारती सिंगमुळे एसजीपी शिखांच्या धार्मिक भावना देखील दुखावल्या आहेत.
काय आहे नेमक प्रकरण?
टिव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन ही भारतीच्या कॉमेडी शोमध्ये आली होती. जॅस्मिनसोबत बोलत असताना भारतीने दाढी मिशा का नको, याबद्दल सांगितल होतं. दूध पिल्यावर दाढी तोंडात टाकली तर शेवयाची टेस्ट येते. माझे अनेक मित्र ज्यांचे आत्ताच लग्न झाले आहे, ते दाढी मिशांवरील उवा काढण्यात दिवस घालवतात. भारतीच्या या वक्तव्यावरून सगळीकडे वाद निर्माण झाला आहे. भारती सिंगने नंतर तिच्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओ शेअर करत माफी देखील मागितली आहे.
भारती म्हणाली की, मी सर्वसाधारणपणे बोलत होते. मी माझ्या मित्रासोबत विनोद करत होते. आजकाल सर्वजण दाढी मिशा ठेवतात. मला कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. जर माझ्यामुळे कोणत्याही धर्माचे लोक दुखावले असतील तर मी हात जोडून सर्वांची माफी मागते. मी स्वतः देखील पंजाबी आहे. माझा जन्म हा अमृतसर मध्ये झाला आहे. मी पंजाबी असल्याचा मला अभिमान आहे. अस म्हणत भारतीने तिची भूमिका स्पष्ट केली.
महत्वाच्या बातम्या :-
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

