🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा ६७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल. प्लेऑफच्या दृष्टीने बंगळुरूसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
या हंगामात, गुजरात टायटन्सने आतापर्यंत १३ सामन्यांत १० विजय नोंदवले आहेत आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहण्याची आहेत. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १३ पैकी ७ सामने जिंकले असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणे कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे.
To stand any chance to make it to the playoffs, we must first beat the Gujarat Titans and the boys are pumped up for the Do or Die clash! ????????
Time to cheer the loudest tonight and back the team, 12th Man Army! ❤️????#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvGT pic.twitter.com/0SVP8FQvmr
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 19, 2022
आयपीएल २०२२मध्ये दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये गुजरात टायटन्सने बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. गुजरातविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने आरसीबीसाठी सर्वाधिक ५८ धावा केल्या होत्या. आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात गुजरातसाठी राहुल तेवतियाने २५ चेंडूत ४३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. गुजरातविरुद्ध आरसीबीच्या शेवटच्या सामन्यात शाहबाज अहमद आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर याच सामन्यात गुजरातकडून प्रदीप सांगवानने २ बळी घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

