मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. पण या संघाला नेहमीच चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. या हंगामात मुंबईची कामगिरी जरी निराशाजनक राहिली असली तरी पाच वेळच्या या चॅम्पियन टीमच्या चाहत्यांची संख्या मात्र अजिबात कमी झालेली नाही. कठीण काळातही मुंबई इंडियन्सचे चाहते टीमला तसाच पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो रिट्वीट केला आहे. या फोटोमध्ये ८६ वर्षांच्या आजी कोलकाता (KKR)विरुद्धच्या सामन्यात घरात टीव्हीसमोर बसून मुंबईला सपोर्ट करताना दिसत आहेत.
आजीबाईंच्या या भावनिक रिअॅक्शनला नेटकरी शेअर करत आहेत. मिती शाह नावाच्या मुलीने हा फोटो ट्वीट केला आहे. ‘ही माझी आजी, रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर तिने अशी प्रतिक्रिया दिली. ८६व्या वर्षीही ती मुंबईचा एकही सामना मिस करत नाही,’ असे कॅप्शन मिती शाहने या फोटोला दिले आहे.
कुटुंबामध्ये असे चाहते असणं हे आमच्यासाठी भाग्याचं आहे, असं रिट्वीट मुंबई इंडियन्सने केलं आहे.
Truly blessed to have such fans as part of #OneFamily ???? https://t.co/NTacGctmhd
— Mumbai Indians (@mipaltan) May 10, 2022
रोहितच्या विकेटचा गोंधळ
दरम्यान रोहित शर्माच्या विकेटवरून मोठा वाद पाहायला मिळाला. पहिल्याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर टीम साऊदीने टाकलेला इन स्विंग चेंडू रोहितला खेळता आला नाही. त्याच्या इनसाइड एजच्या बाजूने चेंडू जाऊन मांडीला लागला आणि यष्टीरक्षक शेल्डन जॅकसनने झेल टिपला. केकेआरच्या अपीलवर पंचांनी रोहितला नॉट आऊट दिले. थर्ड अंपायरने रिप्ले बघितल्यानंतर अल्ट्रा एजमध्ये गोंधळ उडाला. चेंडू बॅटच्या जवळून जण्याअगोदरच स्पाइक दिसत होते. अल्ट्रा एजमध्ये तांत्रिक बिघाड दिसत असतानाही थर्ड अंपायरने रोहितला आऊट द्यायची एवढी घाई का केली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबईचा पराभव
सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताचा डाव २० षटकात ९ बाद १६५ धावांवर संपला. बुमराहने ४ षटकात १ निर्धाव षटक टाकत आणि १० धावा देत ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात मुंबईचा डाव १७.३ षटकात ११३ धावांवर आटोपला. कमिन्सने कोलकाताकडून सर्वाधिक ३ बळी घेतले. कोलकाताने हा सामना ५२ धावांच्या फरकाने खिशात घातला.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

