Share

IPL 2022 LSG vs GT : टॉस जिंकून हार्दिकचा ‘अचंबित’ करणारा निर्णय; दोन्ही संघात पदार्पणवीर खेळाडू!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (LSG vs GT) यांच्यात स्पर्धेतील एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. स्पर्धेच्या या ५७व्या सामन्यासह आज आपल्याला या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ मिळणार आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. साई किशोर गुजरातकडून तर करण शर्मा लखनऊकडून पदार्पणाचा सामना खेळत आहे. लखनऊचा संघ ११ पैकी ८ सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे. तर गुजरातनेही तेवढ्याच सामन्यांमध्ये आठ सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहे.

लखनऊ संघाने आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य दाखविले असून या संघाने मागील पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. फलंदाजीत केएल राहुल, क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा हे त्रिकूट आघाडीच्या फळीत चांगली कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर आयुष बडोनी, कृणाल पंड्या यांनी मधल्या फळीत जबाबदारी स्वीकारली आहे. मार्कस स्टॉइनिस आणि जेसन होल्डर यांनी फिनिशर म्हणून मोठे फटके खेळले आहेत. गोलंदाजीत मोहसीन खानच्या आगमनाने अधिक बळ मिळाले आहे. आवेश खानने गेल्या सामन्यातही जबरदस्त गोलंदाजी केली आणि तो सामनावीर ठरला. याशिवाय दुष्मंथा चमीरा आणि जेसन होल्डर यांनीही चांगली साथ दिली आहे.

गुजरात टायटन्सला मागील दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाच्या फलंदाजीत एकसंध कामगिरीचा अभाव आहे. जिथे पंजाबविरुद्ध बहुतांश फलंदाज फ्लॉप ठरले. त्याचवेळी, मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली सुरुवात केल्यानंतर संघाने अखेरीस सामना गमावला. त्याचबरोबर गोलंदाजीत मोहम्मद शमी चांगलाच महागडा ठरत आहे.

दोन्ही संघांची Playing 11

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, करण शर्मा, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, मोहसीन खान.

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रवीश्रीनिवासन साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!