Share

IPL 2022: MI विरुद्ध ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर कुलदीपचे भावनिक वक्तव्य ; म्हणाला “रोहितने मला…”

Published On: 

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या दुसऱ्या सामन्याला नाणेफेक जिंकून सुरुवात केली. सामन्याच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सचे पारडे जड दिसत होते. मात्र कुलदीप यादवने सामन्याला वेगळी दिशा दिली. कुलदीप यादवने मधल्या डावात आपल्या गोलंदाजीने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना हैराण करून सोडले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ४ विकेट्सने पराभव केला. त्याचबरोबर विजयानंतर डीसी संघाचा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवला सामनावीर घोषित करण्यात आले.

दुसऱ्या सामन्यात कुलदीपच्या (Kuldeep yadav) गोलंदाजीचे कौतुक करण्यात आले. या शानदार कामगिरीनंतर त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. या विशेष सन्मानानंतर बोलताना कुलदीप यादव म्हणाला, ‘माझ्यासाठी तो कठीण काळ होता. दुखापतीमुळे मी पाच महिने बाहेर होतो. माझ्यासाठी पुनर्वसनात जाणे महत्त्वाचे होते आणि NCA मधील सुविधा आणि प्रशिक्षणामुळे मी बरा झालो आहे आणि भारतीय सेटअपमध्ये परतलो आहे. आणि हळूहळू सामन्याची तयारी करू लागलो आणि जेव्हा मी गेम खेळू लागलो तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला आणि रोहितने मला खूप प्रेरित केले.’ रोहितच्या (rohit shrama) मुंबईलाच परास्त केल्यानंतर कुलदीपने त्याचे पाठींब्यासाठी आभार मानले.

दिल्ली कॅपिटल्सकडून पर्दापण करण्याऱ्या कुलदीपने कोच रिकी पॉंटिंगबद्दलही (rickey ponting) यावेळी सांगितले. ‘जे काही बदल करावे लागतील त्याची मी काळजी घेतो. आणि इथे दिल्लीच्या सेटिंगमध्ये मी रिकीशी (पॉन्टिंग) बोललो आणि त्याने मला खूप पाठिंबा दिला. माझ्याकडे बर्‍याच काळापासून गतीची कमतरता होती आणि मी माझ्या लयीवर खूप मेहनत घेतली आहे आणि वेगात बदल असूनही मी चेंडू फिरवण्याबाबत कधीही तडजोड केली नाही.’ कुलदीप हे सगळे सांगताना भावुक झालेला दिसला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!