पुणे : महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएल २०२२मध्ये रंजक लढत होणार आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्ससमोर श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान आहे. या सामन्यात श्रेयसने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. मुंबईने यंदा आपले दोन्ही सामने गमावले असून केकेआरने एक पराभव पत्करला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा बेबी एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविस मुंबईकडून पदार्पण करत आहे. शिवाय अनुभवी खेळाडू सूर्यकुमार यादवचे मुंबई संघात आगमन झाले आहे. कोलकाताकडून रसिक सलाम आणि पॅट कमिन्स यांना संधी मिळाली आहे.
दोन्ही संघांची Playing XI
कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती.
मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
महत्त्वाच्या बातम्या –
- पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘स्पर्श’ घोटाळ्यावर न्यायालयाचे ताशेरे
- “धोनीभाईचा मेंदू कसा काम करतो हे….”, मुंबई इंडियन्सच्या इशान किशननं सांगितली ‘ती’ घटना!
- लग्नाच्या काही दिवसांमध्येच मीराने घेतला होता शाहिदला सोडण्याचा निर्णय; कारण
- “ईडी हे ईडीच्या नियमानुसारच कारवाया करतात”- चंद्रशेखर बावनकुळे
- “12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर मोदींशी चर्चा केली” – शरद पवार
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

