मुंबई : मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या प्रत्येक मोसमातील सर्वात बलाढ्य संघ मानला जातो पण यावेळी काही वेगळे घडत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. तुल्यबळ संघ चेन्नई सुपर किंग्जलाही पराभवाची हॅट्ट्रिक पाहावी लागली आहे. दरम्यान मुंबई संघाचा सलामीवीर फलंदाज इशान किशनने महेंद्रसिंह धोनीच्या ‘क्रिकेंटिंग ब्रेन’बाबत प्रतिक्रिया दिली आहे.
गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स शोमध्ये इशान किशन म्हणाला, ”धोनीचा मेंदू कसा काम करतो हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत असतो. तुमचा विश्वास बसणार नाही. आयपीएलच्या सामन्यात याचा मला अनुभव आला. मी चांगला खेळत होतो आणि गोलंदाजांवर तुटून पडत होतो. पण मग धोनीभाई गोलंदाजाकडे गेला आणि काहीतरी म्हणाला. मला ऐकू आले नाही पण त्याने इम्रान (ताहिर) भाईला काहीतरी सांगितले. मी मनात विचार करत होतो की धोनीभाईने काय सांगितले आहे.”
इम्रान ताहिरने फुल लेंथ बॉल टाकताना इशान किशनची विकेट घेतली. इशानने सांगितले, ”मला काय झाले ते माहीत नाही. आखुड टप्प्याच्या चेंडू होता आणि मी ड्राइव्ह करत थर्ड मॅनकडे कॅच देऊन बसलो. स्पिनर्सना थर्ड मॅनकडे बॅट्समन कसा कॅच देतात, हे मला समजले नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
- 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्द्यावर मोदींशी चर्चा झाली” – शरद पवार
- IPL 2022 KKR vs MI : रोहितला टी-२०मध्ये खुणावतोय मोठा विक्रम; आज ५४ धावा करताच….!
- IPL 2022 : ना रोनाल्डो, ना मेस्सी..! तुम्हाला माहितीये का रोहित शर्माचा आवडता फुटबॉलपटू?
- संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? – शरद पवार
- IPL 2022 : मॅचही गेली अन् २ कोटीचा खेळाडूही; राजस्थान रॉयल्सचा बसला ४४० वोल्टचा धक्का!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


