Share

पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘स्पर्श’ घोटाळ्यावर न्यायालयाचे ताशेरे

Published On: 

पिंपरी-चिंचवड : कोरोनाच्या एकाही रुग्णावर उपचार केलेले नसतानाही भोसरीतील स्पर्श या हॉस्पिटलला तीन कोटी चौदा लाख रुपयांचे बिल पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने अदा केलेले आहे. गेल्या वर्षी ही रक्कम महानगरपालिकेकडून स्पर्श या हॉस्पिटलला देण्यात आले होते. यावरून महानगरपालिकेत फारच वादंग माजले होते. त्यामुळे महानगरपालिका आणि हे बिल अदा करणारे पालिकेचे तत्कालीन आयुक्त बाबूराव पवार आता अडचणीत आले आहेत.

‘स्पर्शकडे ही रक्कम देताना महानगरपालिकेने कोणतीही खातरजमा केलेली नाही. अत्यंत घाईघाईने हा निर्णय घेण्यात आला होता.’ असे ताशेरे उच्च न्यायालयाने महानगरपालिकेवर ओढले आहेत. आता ही रक्कम कशी वसूल करणार आणि ही रक्कम देणारे पवार यांच्यावर काय कारवाई करणार, अशी विचारणा न्यायालयाने महानगरपालिकेला केली आहे.

ही रक्कम अदा करताना त्याला पालिकेच्या स्थायी समितीची मान्यता ही घेण्यात आली नव्हती. हा आर्थिक घोटाळा उघड झाल्यानंतर पालिकेने स्पर्श या हॉस्पिटलचे कंत्राट रद्द केले होते. उच्च न्यायालयाच्या ताशेरेंमुळे पवार यांची पदोन्नती म्हणजेच आयएएसचे प्रमोशन आता अडचणीत आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 KKR vs MI : रोहितला टी-२०मध्ये खुणावतोय मोठा विक्रम; आज ५४ धावा करताच….!
IPL 2022 : ना रोनाल्डो, ना मेस्सी..! तुम्हाला माहितीये का रोहित शर्माचा आवडता फुटबॉलपटू?
संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? – शरद पवार
IPL 2022 : मॅचही गेली अन् २ कोटीचा खेळाडूही; राजस्थान रॉयल्सचा बसला ४४० वोल्टचा धक्का!
“पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणार”; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!