🕒 1 min read
लखनौः इलाहाबाद, फैजाबाद या शहरांनंतर आता लखनौ शहरांचे नाव बदलण्यात येणार का? याविषयी चर्चा सुरु असताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या एका ट्विटमुळं या चर्चांना उधाण आले आहे. पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी या दोन नेत्यांनी लखनौ शहरात बैठक घेतली. यानंतर योगींनी केलेल्या ट्विटनंतर नवाबांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनौ शहराचे नाव बदलण्यात येणार असल्याची चर्चा होत असताना पाहायला मिळत आहे.
शेषावतार भगवान श्री लक्ष्मण जी की पावन नगरी लखनऊ में आपका हार्दिक स्वागत व अभिनंदन… pic.twitter.com/zpEmxzS3OE
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 16, 2022
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी एक ट्विट केले. योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावरील पंतप्रधानांसोबतचा एक फोटो ट्विट करून शेअर केला आहे. या ट्विट मध्ये “शेषावतार भगवान श्री लक्ष्मण जी की पावन नगरी लखनऊ में आपका हार्दिक स्वागत व अभिनंदन…”, असं म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर वापरलेली ही भाषा लखनौ शहराच्या नामांतराचा संकेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता लखनौ शहराचे नाव भगवान लक्ष्मणाच्या नावाने ठेवलं जाऊ शकतं, असा अंदाज आहे.
मुख्यमंत्री योगी यांच्या ट्वीटमध्ये ‘भगवान श्री लक्ष्मण जी की पावन नगरी’ असा उल्लेख असल्याने अंदाज व्यक्त केला जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काही दिवसांपासून लखनौ शहराचे नाव बदलून लखनपुरी, लक्ष्मणपुरी आणि लखनपुर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे लखनौ शहराचे नाव बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
