मुंबई : इमरान खान हा अभिनेता बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून लांब आहे. इमरान खान हा २०१५ मध्ये ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटामध्ये दिसला होता. त्यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसून आला नाही. इमरान खानने त्याची पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. खूप दिवसांपासून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.
खूप दिवसांच्या अफेअरनंतर इमरानने २०११ मध्ये अवंतिकासोबत लग्न केले होते. २०१४ साली त्यांना एक मुलगी झाली. यानंतर त्या दोघांचं नात बिघडू लागलं. अखेर २०१९ मध्ये अवंतिका इमरानला सोडून आई – वडिलांच्या घरी राहायला लागली.
बातम्यांनुसार, इमरानवर असलेले आर्थिक संकट त्यांच्या नात्यांमधील दुराव्याचे कारण बनले. आर्थिक संकटामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत होते. यांच्या सतत भांडणाचा परिणाम, त्यांच्या मुलीवर होऊ लागला. यामुळे अवंतिका आता तिच्या मुलीला घेऊन वडिलांच्या घरी राहत आहे.
अवंतिका खरंतर रणबीर कपूरची गर्लफ्रेंड होती. ‘जस्ट मोहब्बत’ या टिव्ही मालिकेत काम करत असताना, तेव्हा रणबीर तिच्यावर खूप फिदा झाला होता. तिला कायम भेटण्यासाठी जात होता. त्या दोघांमध्ये मैत्रीही खूप चांगली होती. दरम्यान अचानक इमरान आणि अवंतिकाची लव्हस्टोरी सुरु झाली होती, पण आता त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

