रत्नागिरी : ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले होते. तसेच ईडीने २६ मे रोजी अनिल परब यांची १३ तास चौकशी देखील केली होती. या कारवाईच्या प्रकरणावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
अनिल परब हा मातोश्रीचा एजेंट आहे. मातोश्री शिवाय त्यांचे पान हलत नाही. त्यामुळे हे सगळे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोचणार. उद्या उद्धव ठाकरे यांना या कारवाईमध्ये घेतले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही असं निलेश राणे यांनी म्हटले आहे. ते राजापूर येते बोलत होते. अनिल परब ही तर सुरुवात आहे, अजुन त्यांना खुप काही भोगायचे आहे. असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

