Share

IPL 2022 Closing Ceremony : मंत्रमुग्ध व्हावं असा क्षण..! रहमानसोबत संपूर्ण स्टेडियमनं गायलं ‘वंदे मातरम’ गाणं; पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका भव्य समारोप समारंभाचे (Closing Ceremony) आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी ६.२५मिनिटांपासून समारोप सोहळा सुरू झाला होता. हा कार्यक्रम सुमारे ४५ मिनिटे रंगला. या सोहळ्यात ए. आर. रहमान, मोहित चौहान आणि नीती मोहन यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवली. त्याचवेळी, रणवीर सिंगने आपल्या दमदार आणि उत्कट कौशल्याने स्टेडियममध्ये धुमाकूळ घातला.

यावेळी ए. आर. रहमान, मोहित चौहान आणि नीती मोहन यांनी मा तुझे सलाम हे गीत गात संपूर्ण स्टेडियमला मंत्रमुग्ध केले. स्टेडियममधील प्रत्येकजण वंदे मातरम म्हणत होता. या गाण्याचा जयघोष पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

समारोप समारंभात भारतीय क्रिकेटला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा खास पद्धतीने साजरा करण्यात आला. या संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ स्टेडियममध्ये दाखवण्यात आला. एक मिनिट ८ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटचे खास क्षण दाखवण्यात आले. रहमान यांच्या ‘जय हो’ या गाण्यावर संपूर्ण नरेंद्र मोदी स्टेडियम दणाणून गेले होते.

राजस्थानने जिंकला टॉस

आज आयपीएल २०२२ (IPL 2022 Final) चा शेवटचा आणि फायनल सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या महामुकाबल्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने लॉकी फर्ग्युसनला पुन्हा संघात घेतले असून अल्झारी जोसेफला बेंचवर बसवले आहे. राजस्थानने मागील सामन्यातील संघ कायम राखला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!