मुंबई: IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला ५.५० कोटी रुपयांची भरीव रक्कम देऊन खरेदी केले होते. कार्तिकने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याची किंमत योग्य ठरवली आहे. दिनेश कार्तिकने आरसीबीसाठी तीनही सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका बजावली आहे आणि त्याने दोनदा संघाला स्वबळावर विजय मिळवून दिला आहे.
दिनेश कार्तिक यावर्षी आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खालच्या मधल्या फळीत फलंदाजी करत संघात फिनिशर म्हणून खेळत आहे. या भूमिकेत कार्तिकचा खेळ आणखीनच चमकून सर्वांसमोर आला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकला कोणत्याही गोलंदाजाला बाद करता आलेले नाही. तिन्ही सामन्यांमध्ये डीके नाबाद राहिला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कार्तिकने अवघ्या १४ चेंडूत ३२ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
दिनेश कार्तिकच्या या खेळीने सगळ्यांना खूप प्रभावित केले आहे. त्याची फिनिशर म्हणून कामगिरी बघत क्रिकेट रसिकांनी त्याची धोनीसोबत पुन्हा तुलना करणे सुरु केले आहे. एका चाहत्यांने सोशल मीडियावर लिहले की “जर २०१४ आणि २०१६ T20 वर्ल्डकपमध्ये जर दिनेश कार्तिक धोनीच्या जागी असता तर आपण वर्ल्डकप जिंकलो असतो” एकूणच दिनेश कार्तिकच्या कामगिरीने त्याला पुन्हा क्रिकेट विश्वात लाईम लाईट खाली आणले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 KKR vs MI : सूर्या इज बॅक..! मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग; ‘बेबी एबी’लाही संधी!
- पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘स्पर्श’ घोटाळ्यावर न्यायालयाचे ताशेरे
- “धोनीभाईचा मेंदू कसा काम करतो हे….”, मुंबई इंडियन्सच्या इशान किशननं सांगितली ‘ती’ घटना!
- लग्नाच्या काही दिवसांमध्येच मीराने घेतला होता शाहिदला सोडण्याचा निर्णय; कारण
- “ईडी हे ईडीच्या नियमानुसारच कारवाया करतात”- चंद्रशेखर बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

