मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच प्रदर्शित झालेला आरआरआर आणि केजीएफ या चित्रपटांचा कथानक, आशय याचे उदाहरण घेऊन भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. आरआरआर आणि केजीएफ या चित्रपटाचे कथानक आणि भाजपची सद्यस्थितीतील राजकीय डावपेच या दोन्ही मध्ये तुलना करत, भाजपला टोला लगावला आहे. “कसदार स्टारकास्ट सोबतच कथेत सामान्य माणसाचं हित दाखवण्याचा प्रयत्न असल्याने आरआरआर आणि केजीएफ सारखे दाक्षिणात्य चित्रपट हिट होतायेत. पण सध्या राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या चित्रपटात राजकारण सोडून जनतेचं हित कुठंच दिसत नाही.उलट या नव्या स्टारकास्टची लबाडी रोज उघड होतेय.” अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपला सुनावले आहे.
“परिणामी भाजपचा सध्याचा चित्रपट फ्लॉप ठरतोय. म्हणूनच इतरांना तर सोडाच पण स्वतःच्याच १०६ मधील बहुतांश लोकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. त्यामुळं कदाचित पुढील चित्रपटात स्टारकास्ट बदललीही जाईल परंतु स्टारकास्ट बदलल्याने चित्रपट हिट होईलच असं नाही.” असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=550354023113399&id=100044164193097
भाजपाकडून फक्त राजकीय नाटकंच सुरूय. भाजपच्या या सुरु असलेल्या चित्रपटात, चित्रपटाच्या कथेत सामान्य माणूस कुठेही नाही, भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकार करायचं असेल तर यानिमित्ताने का होईना भविष्यात नायक म्हणून सामान्य माणूस आपल्या कथेत दाखवला जाईल का? हा खरा प्रश्न आहे, असेही रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्ट मधून भाजपला उद्देशून म्हणत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :

