Share

धोत्रा-शिवना रस्त्याच्या कामांची चौकशी करून गुन्हे दाखल करा अन्यथा, शिवसेनेने दिला आंदोलनाचा ईशारा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील निकृष्ट दर्जाची कामे झालेल्या रस्त्यांची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे याबाबतची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पाटील लोखंडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण व अजिंठा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिल्लोड तालुक्यातील मौजे केऱ्हाळा ते पळशी व धोत्रा ते शिवना यासह सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध गावातील रस्त्यांची कामे शासनामार्फत हाती घेण्यात आले होते. हि कामे करतांना संबंधित गुत्तेदार व अभियंता यांनी संगनमत करून निकृष्ट दर्जाची कामे केली. व शासनाच्या निधीचा अपहार केला असा आरोप देविदास पाटील लोखंडे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

केऱ्हाळा ते पळशी, धोत्रा ते शिवना रस्त्यासह मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेले नवीन रस्ते व पुलांची कामे, दुरुस्तीची कामे याची चौकशी करून निकृष्ट कामे करणाऱ्या गुत्तेदार व अभियंत्यावर शासनाची दिशाभूल करणे, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य करणे व शासनाच्या पैशाचा अपहार करणे याबाबत गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी करीत संबंधितावर तात्काळ कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात येईल. असा इशारा देविदास पाटील लोखंडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!