🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राजीक्य घडामोडींना वेग आला आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची पिकविमा कंपन्यांविषयीची नाराजी बोलून दाखवली आहे.
”अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवला आहे. पण तरी देखील पिकविमा कंपन्या याचा गांभीर्याने विचार करत नसल्याच दिसत आहे. यामुळे सरकारने पिकविमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि ठरल्याप्रमाणे योग्य ती भरपाई शेतकऱ्यांना मिळवून द्यावी, असे शरद पवारांनी म्हटलं आहे.
राज्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पिकविमा काढला असताना त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. पिकविमा कंपन्या आपल्या सोयीप्रमाणे नियम बदलत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनि केला आहे. पिककर्ज घेताना पिकविमा घेणे शेतकऱ्यांना अनिवार्य केला केल्यामुळे पिकविम्याची बाकीची रक्कम ही सरकारकडून भरली जाते, त्यामुळे असं वाटणं स्वाभाविक असलं. तरी सरकारने पिकविमा कंपन्यांना जाचक अटी शिथिल करून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्याला जमा करणे आवश्यक आहे.
दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना काळजी करू नका पीकविमा कंपन्या कुठे आहे असं म्हणत विमा कंपन्यांना इशारा दिला होता. त्यानंतर पुण्यात आज सकाळी संतप्त शिवसैनिकांनी थेट विमाकंपनीची तोडफोड केली. पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या विमा कंपनीकडे शेतकरी वारंवार अर्ज करत होते. मात्र कंपनी पीक विम्याची रक्कम देत नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आंदोलन करत कंपनीत तोडफोड केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1192022714107621376?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192031836160921600?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
