Share

गोंधळ करणाऱ्यांऐवजी हवेत गोळीबार करणाऱ्या पोलिसांची चौकशी होते : जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

सांगली : खरंतर पोलीस दलाला जास्त अधिकार दिले पाहिजे असं माझं मत आहे. हे मत आज नाही, तर मी गृहमंत्री होण्याच्या आधीपासून आहे. ते यासाठी की एक पोलीस उभा राहिला तर त्याच्या दोन्ही बाजूला १ किलोमीटर कुणाचा आवाज काढण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. पोलिसांचे अधिकार वाढवले तर त्यांचं नैतिक वजन वाढतं. आपल्याकडे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तरी पोलिसांचीच चौकशी होते. गोंधळ करणाऱ्यांची चौकशी लांबच राहते, हवेत गोळीबार करणाऱ्या पोलिसांची चौकशी करणारे आम्ही लोक आहोत, असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. सांगलीतील विश्रामबाग येथे पोलीस मुख्यालयाच्या इमारत भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

पुढे जयंत पाटील म्हणाले, राजकीय नेते-कार्यकर्त्यांकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे, बदलीची धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. नेते आणि कार्यकर्त्यांनी केवळ केसेस आणि बदलीच्या कामा पुरतेच पोलीस ठाण्यात येऊ नका. पोलिसांना पाठबळ देण्यासाठी पण या, असा सल्ला देत राजकीय नेत्यांचेही कान टोचले.

पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे. ‘हे करा, ते करा, बघतोच तुम्हाला, इकडं घालवतो, तिकडे घालवतो’ असे बोलले जाते. त्यांना नोकरीच करायची असते, पण ही लोकं काम करत असतात. मागेच पोलिसांनी चोरांचा पाठलाग करून सोनं, दागिणे हस्तगत केलेले नागरिकांना माझ्याच हस्ते परत दिलेत. ही खरी सेवा असते. ज्याचं सोनं चोरी जातं त्याचं सर्वस्व जातं, त्यामुळे हे सोनं परत मिळाल्यावर हे नागरिक पोलिसांना खूप आशीर्वाद देत असतील, याची मला खात्री आहे.’ असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!