मुंबई – एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आपल्याला कारागृहाऐवजी नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आपले वय व असलेले आजार पाहता आपल्याला नजरकैदेत ठेवण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती नवलखा यांनी न्यायालयाला केली.
नवी मुंबईतील तळोजा कारागृहात वयस्कर आणि आजारी कैद्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही, त्यामुळे आजारपणात आपल्याला घरी नजरकैदेत ठेवा, अशी मागणी करतनवलखा यांनी हायकोर्टात याचिका केली आहे. याची दखल घेत हायकोर्टानं एनआयए आणि राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
सत्तर वर्षीय प्राध्यापक गौतम नवलखा यांनी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण जेल प्रशासनाला दिलं होत. मात्र, सतत छातीत दुखत असूनही कारागृह प्रशासन उपचार करत नाही, अशी तक्रार त्यांनी या याचिकेतून केली आहे. कारागृहात मुलभूत वैद्यकीय पायाभूत सुविधांची वानवा आहे, अपुरे मनुष्यबळ आणि ज्येष्ठ कैद्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचाही अभाव आहे. त्यामुळे इथं कैद्यांची प्रचंड गैरसोय होते असा आरोप या याचिकेतून केला आहे. प्रकृती, वाढतं वय आणि आजारपण या कारणांमुळे आरोपीला नजरकैदेत ठेवले जाऊ शकते या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार या याचिकेतून दिलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दोस्तीत कुस्ती : पुण्यात कॉंग्रेसला खिंडार; दिग्गज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
- आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार!
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’

