Share

रस्ता प्रश्नांबाबत खा.ओमराजे निंबाळकरांकडून प्रशासनाला सूचना

Published On: 

उस्मानाबाद : शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पोलिस अधीक्षक निवा जैन यांच्यासह इतर अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत घेण्यात आली. शहरातील वरूडा रोड ते तुळजापूर नाका ते डी मार्टपर्यंतच्या सर्विस रोडबाबत चर्चा करून या रोडसंदर्भातील अडचणी दूर करून सर्विस रोडचा प्रश्न लवकरात मार्गी लावण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले.

शहरालगतच्या रोडवर स्ट्रीट लाईट बसवून हा भाग प्रकाशमय करण्याबाबत निर्देश देण्यात आले. शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे जिल्हा न्यायालयापासून समर्थ नगरकडे जाणारा मार्ग आणि पोस्ट ऑफिस ते काळा मारुती चौक ते समर्थ चौक या मार्गावरती एकेरी वाहतूक करण्याबाबत सविस्तर चर्चा करून १५ नोव्हेंबरपासून या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. कळंब ते लातूर रस्त्याचे काम विहित मुदतीत पूर्णत्वास नेण्यासाठी संबधित कंत्राटदारास निर्देश देण्यात आले.

सामान्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन कमी करण्यासाठी नागरिकांना नियम पाळण्यासंदर्भात मानसिकता तयार करण्यासाठी जनजागृती करावी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी एकत्र येऊन रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपाय योजना राबविण्याबाबतीत निर्देश देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!