नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवं अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे असंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान आता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक दिलासादायक बातमी दिली आहे. मेड इन कोरोना लस कोवॅक्सिन कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
कोरोना आपली रूपं बदलतो आहे. त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटने तर चिंता अधिक वाढवली होती. आगामी तिसऱ्या लाटेत मुख्य भीती ही डेल्टा व्हायरसची आहे. कोरोनाच्या नव्या रूपावर कोरोना लस कितपत प्रभावी ठरेल याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता चिंता करण्याची गरजच नाही. ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीनंतर आता आयसीएमआरनेसुद्धा ही लस या व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं सांगितलं आहे. हा भारतीयांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विमानतळाच्या नामकरणाचा वाद लवकरच मिटणार’, मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

