Share

भारतीयांची मास्कपासून सुटका नाहीच; व्ही के पॉल म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- गेल्या दीड वर्षापासून ककोनामुळे प्रत्येकाचे आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि हात स्वच्छ धुणे या गोष्टीं सातत्यानं पाळण्याचा, लसीकरणानंतरही संसर्ग रोखण्यासाठी सर्व गोष्टी पाळण्याचा सल्ला तज्ञांमार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे मास्कपासून सुटका कधी असा प्रश्न लोकांकडून वारंवार विचारला जात आहे. आता नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

पॉल यांच्या मते, कोरोनावर मात करण्यासाठी लस, औषध आणि करोना निर्बंधाचं योग्य पालन करणं आवश्यक आहे. जर कोरोनाचा पराभव करायचा असेल तर या सर्व गोष्टी एकत्र पाळाव्याच लागतील, पुढच्या वर्षापर्यंत भारतातील लोकांना मास्कचा वापर करावा लागेल. तिसऱ्या लाटेची शक्यता अद्याप टळली नाही, पुढील काळ धोकादायक आहे. त्याकुळे ‘मास्कपासून सध्यातरी सुटका होणार नाही. आपल्याला पुढील वर्षातही मास्क घालणं सुरू ठेवावं लागेल’, असं पॉल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ५७० करोनाबाधित आढळले असून ४३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३८ हजार ३०३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. नवीन बाधितांसह देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३३ लाख ४७ हजार ३२५ झाली असून आतापर्यंत ३ कोटी २५ लाख ६० हजार ४७४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ९७.६४ टक्क्यांवर आहे.

देशात सध्या ३ लाख ४२ हजार ९२३ सक्रीय रुग्ण उपचाराधीन आहेत. तर करोनामुळे आतार्यंत ४ लाख ४३ हजार ९२८ जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, देशाचा विकली पॉझिटिव्हीटी रेट सध्या १.९३ टक्के असून हा रेट गेल्या ८३ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्क्यांवर असून गेल्या १७ दिवसांपासून हा दर ३ टक्क्यांपेक्षा खाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!