Share

स्पुटनिक लाईटच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून मंजुरी

Published On: 

नवी दिल्ली- रशियाच्या स्पुटनिक-लाईट या कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचणीला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. भारतात सध्या रशियाच्या स्पुटनिक-व्ही या लसीच्या आपात्कालीन वापरला मंजुरी देण्यात आली आहे. स्पुटनिक लाइट ही स्पुटनिक-व्हीची पुढील आवृत्ती असल्याचं रशियानं सांगितलं होतं. या लसीचीही केवळ एकच मात्रा घ्यावी लागणार आहे.

रशियानं तयार केलेली लस भारतात देण्यासाठी हैदराबादमधील डॉ. रेड्डी कंपनीने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडसोबत करार केला आहे. स्पुटनिक-व्ही नंतर स्पुटनिक लाईट लसीला देखील भारतात मंजुरी मिळवण्यासाठी या कंपनीने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार औषध महानियंत्रकांनी या लशीच्या चाचणीला मंजुरी दिली आहे.

आता भारतात या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या होणार आहेत. मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. रशिया, यूएई, घाना आणि इतर देशांमध्ये या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या झाल्या असून ही लस कोरोनाविरोधात 79 टक्के प्रभावी असल्याचं रशियानं म्हटलं आहे. या लशीच्या एका मात्रेची किंमत 737 रुपयांच्या आसपास असेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!