नवी दिल्ली : भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज सबा करीमने (Saba Karim) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ ऐतिहासिक विजय मिळवू शकतो, असे साबा करीमने म्हटले आहे. सबा करीमच्या मते, टीम इंडियामध्ये अशी क्षमता आहे की ते इतिहास रचू शकतात.
भारतीय संघाने अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही. आणि यावेळी हा दुष्काळ संपायला टीम इंडियाला नक्कीच आवडेल. भारताने यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त विजय मिळवला होता आणि आता त्यांना दक्षिण आफ्रिकेलाही हरवायचे आहे.
एका कार्यक्रमातील संवादादरम्यान सबा करीम म्हणाले की, भारतीय संघ कसोटी मालिका जिंकू शकतो. याशिवाय सबा करीमने मालिकेची स्कोअरलाइनही सांगितली. ते म्हणाले, भारतीय संघ कसोटी मालिका २-० किंवा २-१ ने जिंकू शकतो.
भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी – सबा करीम
सबा करीमच्या मते, भारतीय संघाकडे ज्या प्रकारची बेंच स्ट्रेंथ आणि अनुभव आहे, ते पाहता यावेळी संघ कसोटी मालिका जिंकू शकतो. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ज्या प्रकारे कामगिरी केली त्यावरून ते किती मजबूत आहेत हे दिसून येते. आमच्या संघात पाच किंवा सहा महत्त्वाचे खेळाडू नव्हते आणि तरीही आम्ही ती मालिका जिंकली. यावरून लक्षात येते की आमच्याकडे किती महान खेळाडू राखीव आहेत. यावेळीही मला आशा आहे की आम्हाला सुवर्ण संधी मिळेल आणि संघ खूप अनुभवी आहे. याशिवाय आमचे युवा खेळाडूही चांगले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादीकडून आज दुग्धाभिषेक
- “मोदींजींनी खरे शिवभक्त असल्याचे संपूर्ण देशाला दाखवून द्यावे, अन्यथा…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

