मुंबई: मोदी सरकारच्या कार्यकाळाला नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आठ वर्षांचा जल्लोष साजरा करताना भाजपने समाज माध्यमांवर आपली टिमकी वाजवण्यासाठी ‘आठ वर्ष मोदी सरकारच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची’ ही मोठी जाहिरातबाजी केली. मात्र याच आठ वर्षांचा परिणाम आता देशाला चांगलाच भोवणार आहे. जागतिक बाजारात भारतीय रुपयाची ७८.१४ रुपये इतकी सर्वाधिक घसरण नोंद करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचा दावा सुरुवातीपासूनच मोदी सरकारने केला. असा टोला राष्ट्रवादीने केंद्राला लगावला आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळाला नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आठ वर्षांचा जल्लोष साजरा करताना भाजपने समाज माध्यमांवर आपली टिमकी वाजवण्यासाठी 'आठ वर्ष मोदी सरकारच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची' ही मोठी जाहिरातबाजी केली. #RupeeVsDollar #RupeeFalls @BJP4Maharashtra pic.twitter.com/2RxMGzaGVT
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 13, 2022
अमेरिकेत आलेली आर्थिक मंदीची झळही आपल्याला बसणार नाही, असा बचावात्मक पवित्रा केंद्राने घेतला. वास्तविक जागतिक अर्थव्यवस्थेकडे डोळसपणे न पाहता अतिआत्मविश्वास बाळगल्यामुळे त्याचा फटका आता भारतीय रुपयाला बसताना दिसत आहे. २००९ साली देखील अमेरिकेत आर्थिक मंदी आली होती, ज्याचे पडसाद जगभरात पाहायला मिळाले. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे भारताला त्याची अधिकची झळ पोहोचली नव्हती. असा दाखलाही राष्ट्रवादीने दिला आहे.
५६ इंच छातीचा दाखला देत बसण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांनी समस्येला समजून घेत सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून विधायक निर्णय घेतले होते. मात्र आज राज्यसभेपासून ते राष्ट्रपती आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या एकेक जागेची निवडणूक लढविण्यात भाजप आणि त्यांचे म्होरके व्यस्त असलेले दिसतात. त्यामुळेच त्यांच्याकडून अर्थव्यवस्था सावरण्याचे कोणतेही विधायक निर्णय होताना दिसत नाहीयेत. परिणामी रुपयाचे विक्रमी अवमूलन झाले असून त्याचा परिणाम आता पुन्हा एकदा महागाईचा आकडा वाढण्यावर होईल. अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज ठाकरे यांच्या भेटी नंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- अभिनेत्री ईशा गुप्ता फिगर परफेक्ट ठेवण्यासाठी जिममध्ये तासन्तास घाम गाळते! पहा VIDEO
- “काँग्रेसचा एक उमेदवार मागे घेण्यात यावा अन्यथा..” ; गिरीश महाजनांचा सल्ला
- IND vs SA : भारतासाठी मालिकेत पुनरागमन करणे अतिशय कठीण, ‘या’ माजी खेळाडूंचं मोठं वक्तव्य!
- इंग्रजांचे जसे राज्य होते त्याप्रमाणे देशात भाजपची हुकूमशाही सुरू – नाना पटोले


