Share

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राऊत यांना थोडा आवर घालावा’

Published On: 

मुंबई- शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टरांसह देशातील डॉक्टरांबद्दल केलेल्या अपमानजनक  विधानामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठत आहे.

संजय राऊत यांनी, ‘WHO ला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नही. कंपाऊंडरकडून घेतो. कारण त्यांना जास्त कळतं.’ असे विधान केलं होतं.

राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या विधानामुळे राऊत तसेच महाविकास आघाडीचे सरकार याविरोधात नाराजी वाढू लागली आहे.  या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी नाराजी दर्शवली आहे.

अविनाश भोंडवे म्हणाले,कोरोनामुळे उद्भवलेल्या भीषण  परिस्थितीत डॉक्टर रुग्ण बरे होण्यासाठी काम करत आहेत.काही डॉक्टरांच्या चुकीच्या कामामुळे सर्वच डॉक्टरांवर बोट केलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचं मनोधैर्य वाढवणे अपेक्षित असताना त्यांचं मनोबल कमी होणार नाही याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे .संजय राऊत यांनी विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी असंही भोंडवेंनी सांगितले.

तर दुसऱ्या बाजूला विधानाचा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) महाराष्ट्र राज्य शाखेने तीव्र निषेध केला आहे. या पूर्वीही आयुर्वेदिक उपचाराविषयी चुकीचा संदेश जाईल, असे चुकीचे वक्तव्य केले होते. लोकांचा पक्ष म्हणून शिवसेनेविषयी सर्वसामान्य माणसाला आदराची आणि आपलेपणाची भावना आहे. परंतु एका सेना खासदाराने वारंवार डॉक्टर आणि आयुर्वेदिक सारख्या भारतीय आणि पुरातन चिकित्सा पद्धतीवर उपहासात्मक व्यंग करणे अत्यंत निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राऊत यांना थोडा आवर घालावा, अशी मागणी निमा संघटनेनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

तुम्ही धीर सोडू नका, राज ठाकरेंचं ‘मनसे’ आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्याची रयतची मागणी

संजय राऊत बोलले आणि वादळच आले; मंत्री जितेंद्र आव्हाडांनी देखील केले ‘त्या’ विधानाचे समर्थन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!