🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आठ तास चौकशी करून अटक केली. त्यानंतर न्यायालयात दोन्ही बाजू मांडण्यात आल्या आणि तद्पश्चात त्यांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र अचानक प्रकृती खालावल्याने (Nawab Malik health deteriorated) त्यांना जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सध्या भाजप नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांचे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.
मोहित कंबोज यांनी या पार्शभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना निशाण्यावर धरले आहे. छातीत कळ आणण्याचे सत्तावीस उपाय छगन भुजबळ असे पुस्तकाचे कव्हर त्यांनी पोस्ट करत अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्यामुळे सध्या त्यांचे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) February 25, 2022
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत संजय राउत यांनी शिवसेना पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांच्यावर अनेक आरोप केले होते. यानंतर मात्र काहीच दिवसांनी ईडीने नवाब मलिक यांची चौकशी करत त्यांना अटक केली आहे. त्यामुळे भाजपने या मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला चारी बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यातच मोहित कंबोज यांचे ट्वीट जखमेवर मीठ चोळण्यासारखे ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
अखेर ठिकाण ठरलं, मनसेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदाच होणार मुंबईबाहेर
-
मनसेचा अनोखा उपक्रम; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक लाख पोस्ट कार्ड्सचे करणार वाटप
-
VIDEO : अरे…यांचं चाललंय काय? मास्क घालताना शिवसेना नेत्याची झाली फजिती; तुम्हीच पाहा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
