टीम महाराष्ट्र देशा: भारत – पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेल्याने मध्यंंतरी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती, दोन दिवसांपूर्वीच मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय झाला आहे. आता दोन्ही देशांतील पक्षी देखील एकमेकांचे दुश्मन झाल्याचं दिसत आहे. याला कारण ठरले आहे ते, पाकिस्तानी हेर पक्षाला भारतीय पक्षांनी मारल्याचे.
बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एक खळबऴजनक घटना घडली आहे. एका पक्षाला इतर पक्षांनी चोचीने घायाळ केले. स्थानिक नागरिकांनी पहिल्यानंतर घायाळ होवून मेलेल्या पक्ष्याच्या पंखांखाली एक हेरगिरी करणारे य़ंत्र लावण्यात आल्याचं दिसून आलं. हा पक्षी पाकिस्ताकडून हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचं बोलले जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून अनेकवेळा राजस्थानच्या सीमेवर असे पक्षी सोडण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र बिहारमध्ये पक्षांच्या लढाईत मेलला पक्षी एवढे लांब कसे काय गेला याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे यंत्र लावलेले पक्षी पाकिस्तानातून हेरगिरीसाठी येतात.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

