Share

कॉंग्रेसने केलेले सर्जिकल स्ट्राईक सैन्यालाही माहित नाही : राज्यवर्धनसिंह राठोड

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून सैन्य दलाच्या कामगिरीचा फायदा उठवण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसत आहे. भाजपकडून आपल्या सत्ता काळात सर्जिकल स्ट्राईक केल्याचं सांगत प्रचार केला जात आहे. तर आता काँग्रेसने देखील युपीए सत्ताकाळात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या तारखांवरून भाजपने कॉंग्रेसवर पलटवार करायला सुरुवात केली आहे.

काँग्रेसच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दाव्याला केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी लष्करी अधिकारी राज्यवर्धन राठोड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सैन्यात तर मी होतो, आम्हाला माहित नाही हे कधी झालं. सर्व सैन्य आज भाजपसोबत आहे, त्यांचा पाठिंबा असाच नाही मिळालाय, कारण आम्हाला माहित आहे तिथे काय होतं अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसचा दावा खोडून काढला आहे.

दरम्यान, गुरुवारी पत्रकार परिषद घेवून यूपीए सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला होता आणि त्यांच्या तारखाही जाहीर केल्या होत्या.

कधी झाले काँग्रेसच्या सत्ताकाळात सर्जिकल स्ट्राईक

१ ) 19 जानेवारी 2008,

२ ) 30 ऑगस्ट- 1 सप्टेंबर,

३ ) 6 जानेवारी 2013,

४ ) 27-28 जुलै 2013,

५ ) 6 ऑगस्ट 2013

६ ) 23 डिसेंबर 2013

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!