Share

कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत भारत, अमेरिका आणि चीन आघाडीवर ; WHO ची माहिती

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जगभरात तितक्याच मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहिम राबविली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोना महामारीदरम्यान, आतापर्यंत दोनशे कोटी लसीचे डोस वाटप केले गेले आहेत.

भारत, चीन आणि अमेरिका या देशात सर्वाधिक ६० टक्के लस नागरिकांना दिली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अॅडनॉम घेब्रेयसिसचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस एल्वार्ड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लसीकरणाची ही संख्या अपेक्षेप्रमाणे आहे. संस्थेने कोव्हॅक्स मोहिमेअंतर्गत १२७ देशांना ८ करोड लसीचे डोस दिले आहेत. भारत, अमेरिका आणि चीनला २०० करोडपैकी प्राप्त झालेल्या लसींपैकी ६० टक्के लस त्यांच्याच देशात तयार आणि वितरित करण्यात आले आहेत.

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदूतांना २ लाख कोरोना लसी पहिल्या खेपेत पाठविल्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस यांचे प्रवक्ते अँटोनियो गुटेरेस यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत जगातील गरीब देशांमध्ये फक्त ०.५ टक्के लस पोहोचली आहे. जी जगातील लोकसंख्येच्या दहा टक्के आहे. तसेच भारतातील सीरम संस्था जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतात आल्यामुळे दुसर्‍या लाटेमुळे सीरम संस्थेतून तयार होणार्‍या लस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे ब्रूस एल्वार्ड यांनी सांगितले.

दरम्यान भारतामध्ये लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!