🕒 1 min read
नवी दिल्ली: काल (८ डिसेंबर)तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. त्यात भारताचे सीडीएस बिपिन रावत हे सुद्धा होते. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत(CDS General Bipin Rawat)यांच्यासह १२ जण शहीद झाल्याची माहिती दिली आहे. यावरच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मी जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करतो.ही सर्वांसाठीच मोठी शोकांतिका आहे.आणि या कठीण काळात आमचे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही मनापासून शोक. या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे. असे ट्वीट करत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.
I extend my condolences to the family of Gen Bipin Rawat and his wife.
This is an unprecedented tragedy and our thoughts are with their family in this difficult time.
Heartfelt condolences also to all others who lost their lives.India stands united in this grief.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 8, 2021
दरम्यान या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल हे होते.या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. या महाविद्यालयात बिपीन रावत यांच लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत दिल्लीला रवाना होणार होते. कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते.
महत्वाच्या बातम्या:
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा कायम लक्षात राहील- शरद पवार
- ‘रविचंद्रन अश्विन अशीच गोलंदाजी करत राहिल्यास कुंबळेलाही मागे टाकेल’
- मावशी पद्मीनी कोल्हापूरेंनी केलेल्या कमेंटमुळे श्रध्दा कपूरची पोस्ट आली चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
