Share

भारताने या आधीचं पाकिस्तानशी सगळे संबंध तोडायला हवे होते : संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारत ७० वर्ष पाकिस्तानशी चर्चा करत आहे. तरी देखील जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता माजली म्हणून भारताने आता कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला याबद्दल काय वाटते हे महत्वाचे नाही तर भारतानेचं पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडायला हवे होते, असे म्हणत शिवसेना खा. संजय राऊत यांनी पाकिस्तानने भारताशी तोडलेल्या संबंधांवर प्रतिक्रिया दिली आहे.

मोदी सरकारच्या कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानने भारताच्या निर्णयाचा निषेध केला असून भारतासाठी हवाई मार्ग बंद केला आहे. तसेच भारताच्या राजदूतांना जाण्यास सांगितले आहे. तर आपले देखील अधिकारी माघारी बोलावले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तडकाफडकी निर्णय घेत. इतर देशांना देखील हवाई मार्ग बदलण्याची नोटीस दिली आहे. तर काही विमानांना उंचीवरून उड्डाण करण्यास सांगितले आहे.

यावर खा. संजय राऊत म्हणाले की, ‘पाकिस्तानशी संबंध याआधीचं तोडायला हवे होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० बाबत योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला याबाबत काय वाटते हे महत्वाचे नाही. उलट दिल्लीतील पाकिस्तानचे दूतावास कार्यालय बंद केले पाहिजे. मुंबईच्या कार्यालयाला देखील टाळा मारला पाहिजे.आज पाकिस्तानमुळेचं भारतात दहशतवाद वाढला आहे. पाकिस्तान हा देश दहशतवादी बनवण्याचा कारखाना आहे. त्यामुळे असल्या देशांशी संबंध तोडलेलेचं बरे’, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

काश्मीरमध्ये जमिन घेण्याची घाई का? शरद पवारांचा संतप्त सवाल

 

मेरे प्यारे देशवासियों, संध्याकाळी आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार देशाला संबोधित

 

राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याने केले शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताचे खंडन

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!