Share

टीम इंडियाचा श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय; रोहित, राहुलची शानदार शतके

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कपमधील शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने ७ गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने अंकतालिकेत अग्रस्थान पटकावले आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया आता न्यूझीलंडशी भिडणार आहे.

सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने लंकेने दिलेले २६५ धावांचं आव्हान सहज पार केले. रोहित शर्मा १०३ धावा आणि लोकेश राहुलने १११ धावांचे योगदान दिले तसेच कर्णधार विराट कोहलीने नाबाद ३४ धावा केल्या त्यामुळे टीम इंडियाला विजय मिळवणे सहज शक्य झाले.

तत्पूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ बाद २६४ धावा केल्या होत्या. लंकेकडून माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने शानदार शतकी खेळी केली त्याने ११३ धावा केल्या. तर थिरिमानेनेही अर्धशतक झळकावत ५३ धावांची खेळी केली. टीम इंडिया कडून जसप्रीत बूमराहने ३७ धावांत ३ गडी बाद केले तर भुवनेश्वर, पांड्या, जडेजा आणि कुलदीप यादवने एक- एक गडी बाद केला.

दरम्यान, सेमीफायनलमध्ये टीम इंडिया आता न्यूझीलंडशी भिडणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये दुसरी सेमीफायनल होणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!