Share

शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपयांची मदत द्या; महाराष्ट्र किसान सभेचे परळी येथे आंदोलन

Published On: 

परळी वैजनाथः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान सभेतर्फे येथील उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांचा मंजूर असलेला 2018 चा पीकविमा तत्काळ वाटप करावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपयांची मदत द्यावी, शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, पंतप्रधान किसान सन्मान योजनेत सर्व शेतकऱ्यांचा समावेश करा, 2018 चे दुष्काळी बागायती अनुदान वाटप करा, या प्रमुख पाच मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवारी येथील उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी माकपचे सचिव पी. एस. घाडगे, बी. जी. खाडे, प्रभाकर नागरगोजे यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, गंगाधर पोटभरे, सुदाम देशमुख, सुदाम शिंदे, विष्णू देशमुख, शरदकुमार महाजन, कल्याण देशमुख, भक्तराज शिंदे, मदन वाघमारे, प्रवीण देशमुख, अशोक जाधव, मुक्तेश्वर कडभाने, मनोज देशमुख, सखाराम शिंदे यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1199256181950124032?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1199253468499722240?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!