Share

इंदापूर : डेंग्यूमुळे सहा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावात राहणारी प्रणिती उर्फ गुण गुणी सुनील कायगुडे (वय 6) या चिमुकलीचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत स्थानिक सरकारी आरोग्य केंद्रातून माहिती देणे अपेक्षित आहे तरीही कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मदनवाडी गावात पहिलीच्या वर्गात शिकणारी गुणगुनी या चिमुकलीचा डेंग्यू आजाराने मृत्यू ओढवला असून कायगुडे यांच्या घरात काही दिवसांपासून तिचे वडील सुनील, आई मनीषा आणि आजी मालन कायगुडे यांना डेंग्यू सदृश ताप येत असल्याची माहिती मिळत आहे.

सुनील कायगुडे यांनी भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गावरील आय सी यु सेंटर या दवाखान्यात उपचार घेतले, असून आई मनीषा आणि आजी मालन यांनी भिगवण येथील नामांकित खानावरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांची प्रकृती सुधारली असून काही दिवसांपूर्वी गुण गुणीला ताप आल्याने तिला भिगवण येथील लहान मुलांच्या दवाखान्यात गुणगुणीची तपासणी करीत बारामती येथील लहान मुलांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते.

मात्र तिची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने पुणे येथील के इ एम हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र तीच्या प्रकृती मध्ये आणखीच बिघाड झाल्याने दोन दिवसांपूर्वी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या वर अंत्यसंस्कार करून तिच्या आईला पुन्हा उपचारासाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करीत त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली असल्याची माहिती मिळत आहे. चिमुकलीच्या जाण्याने मदनवाडी गावा वर शोककळा पसरली असून डेंग्यू आजाराच्या भीतीने नागरिक घाबरून गेले असल्याचे दिसून येत आहे. भिगवण येथील हॉस्पिटलमधील डेंगू आजाराने खाटा भरून गेल्या असल्याचे माहिती मिळत आहे.

इंदापूर तालुका वार्तापत्र टीम कडून कोणीही घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सर्व नागरिकांनी कोरडा दिवस पाळून डासांची उत्पत्ती थांबविण्याची विनंती करण्यात येत आहे. शेजारील गावातील आणि परिसरातील सरपंच आणि भाऊसाहेब यांना ग्रामस्थांन कडून डेंगूचे डास जातील अशी फवारणी करावी अशी विनंती केली जात आहे असेही दिसून येत आहे.

एकदा फवारणी करून चालणार नाही. आठवडा भर फवारणी करा डेंगू पळून जाईल असे ही स्थानिक नागरिक म्हणत आहेत. आणि सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपले काम कधीतरी प्रामाणिकपणे करावे असे ग्रामस्थ म्हणत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1193083683034386433?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1193082770047696897?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!