🕒 1 min read
मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबादमध्ये तिसरा वनडे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन संघात परतला. एकदिवसीय मालिका सूरु होण्याआधी शिखराला कोरोनाची लागण झाली होती. त्यावर मात करत शिखर धवनने संघात वापसी केली आहे.
शिखर धवन आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बऱ्याच दिवसांनी परतली. शेवटच्या या सामन्यात शिखर धवनला केवळ १० धावा करता आल्या आणि त्याने २६ चेंडू खेळले. शिखर धवनला पहिल्या १४ चेंडूत एकही धाव करता आली नाही. त्यानंतर त्याने १५ व्या चेंडूवर पुढे जाऊन सिक्सर मारत खाते उघडले. मात्र, दुसरी कडून विकेट पडत गेल्या आणि शिखरलाही नंतर आपला डाव पुढे नेता आला नाही.
शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. चौथ्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याच ओव्हरमध्ये विराट कोहलीही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर शिखर धवननेही १०व्या ओव्हरमध्ये आपली विकेट गमावली. मात्र भारतीय संघाने मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे. स्पर्धेचे तीनही वनडे सामने अहमदाबादमध्ये खेळले गेले होते. ज्यात भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. या शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या संघात चार बदल केले आहेत. श्रेयस अय्यर, शिखर धवन, कुलदीप यादव आणि दीपक चहर यांना संघात स्थान मिळाले.
महत्वाच्या बातम्या
- महत्त्वाचं काय आहे? देश की धर्म?” हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल!
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद रत्नागिरी दौऱ्यावर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावाला देणार भेट
- ट्वीटरवर होत आहे रामदास आठवलेंच्या ‘या’ फोटोची चर्चा
- रविना टंडनच्या वडिलांचे निधन
- PUSHPA FEVER! ‘श्रीवल्ली’ गाण्याचे इंग्लिश व्हर्जन व्हायरल


