मुंबई: विराट कोहली शुक्रवारीपासून श्रीलंकेविरुद्ध त्याचा १००वा कसोटी सामना खेळत आहे. या ऐतिहासिक कसोटीची संधी साधत विराट त्याचा बहुप्रतीक्षित ७१वा शतक करेल अशी आशा चाहत्यांना होती. तो मात्र अर्धशतकही पूर्ण न करता माघारी परतला. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर एकचं गोंधळ उडाला. एका चाहत्यांने विराट किती धावा करत कोणाच्या चेंडूवर आणि कसा बाद होईल हे तो खेळायला उताऱ्याचा अनेक तासांआधीच सांगून ठेवले होते.
विराट कोहली (virat kohli) त्याच्या १०० व्या कसोटी सामन्याच्या विशेष प्रसंगी मैदानावर आरामात दिसत होता आणि तो शानदार फलंदाजी देखील करत होता. ४४ व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने हनुमा विहारीसोबत (hanuma vihari) ९० धावा जोडल्या. श्रीलंकेचा फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनियाने चेंडू टाकला आणि कोहलीने तो बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर अविश्वासात होता आणि प्रेक्षक थक्क झाले. आणि अशीच सारखी भविष्यवाणी त्या चाहतीने देखील ट्विटरवर केली होती.
Kohli Won't score a 100 in his 100th test. Will score 45 (100) with 4 gorgeous cover drives and then Embuldeniya will knock his stumps over and he'll pretend to be shocked ???????? and will nod his head in disappointment
— shruti (@Quick__Single) March 3, 2022
कोहली त्याच्या १०० व्या कसोटीत १०० धावा करणार नाही. ४ कव्हर ड्राइव्हसह ४५ (१००) धावा करेल आणि नंतर एम्बुल्डेनिया त्याचे स्टंप उडवेल आणि तो धक्का बसल्याचे नाटक करेल आणि निराशेने मान हलवेल. “विराट कोहलीला त्याच्या १०० व्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात ७६ चेंडूत ४५ धावा करता आल्या आणि त्याच्या डावात ५ अप्रतिम चौकारांचा समावेश होता. चाहत्याचा अंदाज पूर्णपणे अचूक नव्हता परंतु लसिथ एम्बुल्डेनिया कोहलीला बाद करेल असा अंदाज चाहत्याने वर्तवला होता. चाहत्याने केलेला अंदाज पाहून क्रिकेटरसिक आश्चर्यचकित झाले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या ट्विटला आधीच ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “सत्ता गेली याचा इतका राग…”, संजय राऊतांचा भाजपला जोरदार टोला
- Shane Warne Death: “खूपच लवकर गेलास मित्रा…” शेन वॉर्नच्या जाण्यावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले दुःख
- Russia Ukraine War: युक्रेनमध्ये गोळीबारीत जखमी झालेल्या हरजोत सिंगबाबत भारत सरकारचा महत्वाचा निर्णय
- Shane Warne Death : अरेरे..! मृत्युला सामोरं जाण्याच्या 12 तासांपूर्वी वॉर्ननं केलं होतं ‘असं’ ट्वीट!
- Russia Ukraine War: व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या बाबतीत रशियन मीडियाचा खळबळजनक दावा


